सातपूर - सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधुम सुरू असताना आनंदवल्लीत एक युवक बुडाला असून तब्बल 36 तास उलटले तरी अद्याप तो सापडलेला नाही. विष्णू डगळे (वय ३४, रा. गंगापूर) व प्रवीण शांताराम चव्हाण (मूळ रा. मालेगाव, हल्ली रा. स्वराज्य चौक, सातपूर कॉलनी) हे विसर्जनाच्या दिवशी आनंदवली येथे गेले होते.
त्यावेळी प्रवीण चव्हाण हा पाण्यात गेला असता त्याला खोलीचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. प्रवीण चव्हाण हा सातपूर येथे एका खाजगी कंपनीत काम करत होता. सातपूर कॉलनीत तो बॅचलर म्हणून राहत होता.
दरम्यान, एस. एन. पाटील पाण्यात बुडत असताना त्यांना वाचवण्यात यश आले आहे. पाण्यात वाहून गेलेले प्रवीण चव्हाण यांचा शोध अद्याप लागला नसल्याने अग्निशामक दल 36 तासांपासून शोध कार्य करत आहेत. या घटनेने विसर्जन धामधुमीला गालबोट लागले आहे.