त्र्यंबकेश्वर येथील मृत्युंजय बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि त्र्यंबकेश्वरचा राजा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करतांना त्यामध्ये भागवत साप्ताह करण्यात येत आहे. .त्र्यंबकेश्वर येथील मेनरोडवर त्र्यंबकेश्वरचा राजा मित्र मंडळ व मृत्युंजय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुणाल (सनी) उगले व मंगेश धारणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दशकांपासून आयोजित केलेल्या 'त्र्यंबकेश्वर राजा' गणेशोत्सव अभिनव पद्तीने संपन्न होत आहे.
मंडळाने पूर्वीच्या ९ फूट उंचीच्या मूर्तीऐवजी ११ फूट उंचीची भव्य फायबरग्लास गणेश मूर्ती स्थापित केली आहे.ही मूर्ती साडेआठ रुपयांच्या दागिन्यांनी सजवलेली आहे, ज्यामध्ये सोन्याने मढवलेल्या काही चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.या सुंदर मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. पूर्वीची ९ फूट उंचीची गणेशमूर्ती देखील जपली आहे.
गानेशोसात्व साजरा करतांना त्यासाठी भव्य मंडप टाकण्यात येतो.या मंडपात दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी आणि पूजा दर्शनासाठी आलेले भक्त याचा लाभ घेतात.दररोज दुपारी कथा श्रवण करण्यासाठी भक्त गर्दी करतात.वेद्शास्र संपन्न संकेत शास्त्री दीक्षित कथेचे निरुपण करत आहेत.
या मंडळाच्या वतीने नेत्र रोग निदान शिबीर,आधार कार्ड,मतदार नोंदणी यासह समाजपयोगी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविणारे,माघी गणेशोसात्व साजरा करणारे.आपत्ती काळात मदत करणारे असे हो मंडल मागच्या २० वर्षांपासून सेवा करत आहे.
त्यासाठी संस्थापक अध्यक्ष, मंगेश धारणे, कुणाल उगले,अध्यक्ष जयदिप शिखरे,उपाध्यक्ष प्रणव जोशी,राहुल खत्री, कोषाध्यक्ष संकेत गायकवाड,सचिव भालचंद्र निखाडे, सदस्य प्रसाद हातवळणे, अभिषेक चांदवडकर, मयुरेश चांदवडकर, अमोघ चांदवडकर, वेदांत केदार, बाळू गोंदके,रतीष जोशी,गौरव धारणे,पुष्कर धारणे,हितेश धारणे,किरण जोशी,राहुल उगले,धनेश मुंदडा,रवि माळी, मनोज तानपाठक,सचिन दिघे, अंकुश दिवटे,अजय दिवटे,श्रेयस जोशी, हरीष पन्हाळे, निनाद शिखरे, सुमित शिखरे,संकेत चांदवडकर,सुहास जोशी,नरेंद्र काथे आणि पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.