नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना श्रमिकनगर परिसरात घडली.
जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार सातपूर येथे घडला. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. 27 ऑगस्ट रोजी ती आईसोबत झोपलेली असताना तिच्या बापाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
त्यानंतर त्याने मुलीच्या मैत्रिणीशी फोनवर अश्लील संभाषण केले. यावेळी त्याने मुलीच्या आईलाही हाताच्या चापटीने मारून शिवीगाळ करीत धमकी दिली. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तिच्या बापाविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुहासिनी बारेला करीत आहेत.