नाशिक : सातपूर कॉलनी परिसरात ड्रेनेज टाकी खचल्याने इमारतीला धोका
नाशिक : सातपूर कॉलनी परिसरात ड्रेनेज टाकी खचल्याने इमारतीला धोका
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : सातपूर -कॉलनी परिसरातील एचडीएफसी बँके शेजारील ड्रेनेज लाईनच्या टाकीचा स्लॅप अचानक  कोसळल्याने शेजारील ईमारतीला धोका निर्माण झाला आहे.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

देवाला वाहिलेली फुलं विसर्जित करण्याची योग्य वेळ माहिती आहे का? शास्त्रात सांगितलाय महत्त्वाचा नियम

या  घटनेने शेजारी असलेल्या तीन मजली इमारतीचा पाया खचला असून इमारतीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारी असलेल्या आयुष नावाच्या चायनीज दुकानाचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मनपा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून धोकादायक इमारतीचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group