दैनिक भ्रमर : हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. जर एखाद्याने खरी श्रद्धा ठेवून आणि योग्य पद्धतीने पूजा केली तर मनाला शांती, समाधान तर मिळतेच त्यासोबतच घरात देखील सकारात्मक उर्जा निर्माण होते.
आपण देवी देवतांची पूजा करताना फुल अर्पण करण असतो. पण हे फुलं अर्पण केल्यानंतर देव्हाऱ्यातून कधी काढावी याचा वास्तुशास्त्रात नियम सांगितलेला आहे. तो आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून देवाची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहील.
वास्तुशास्त्रानुसार, कोमेजलेली किंवा सुकलेली फुलं मंदिरात ठेवणं शुभ मानलं जात नाही. अशी फुलं घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होण्याची भीती अधिक असते. अशावेळी घरातील सदस्यांमध्ये चिडचिड किंवा राग वाढू शकतो. त्यामुलेच देवघरात ठेवलेली फुलं योग्य वेळी काढून विसर्जित करणं आवश्यक आहे.
पूजेच्या वेळी बहुतांश लोक देवांना फुलं अर्पण करतात. पण अनेकदा ती फुले वेळेत काढली जात नाहीत. वास्तुशास्त्रानुसार, देवांना अर्पण केलेली फुलं तात्काळ काढायची नसली तरी सूर्यास्त होण्यापूर्वी ती काढून विसर्जित केली पाहिजेत.