नाशिक मधील माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील या विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक मध्य मधून काँग्रेस कडून तिकीट न मिळाल्याने नाराज झाल्या होत्या.
त्यानंतर हेमलता पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र काही दिवसानंतर त्या पक्षातूनही त्यांनी राजीनामा देत आपण कोणत्याच पक्षात प्रवेश करत नसल्याचे जाहीर केले होते.
मात्र, आता त्या अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहोळा मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.