Nashik Crime : वयाच्या 16 व्या वर्षी मुलीने दिला बाळाला जन्म; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
Nashik Crime : वयाच्या 16 व्या वर्षी मुलीने दिला बाळाला जन्म; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :-अल्पवयीन मुलीने वयाच्या सोळाव्या वर्षीच बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी व 31 वर्षीय आरोपी यांची जुलै 2024 मध्ये ओळख झाली होती. आरोपीने तिच्याशी मैत्री वाढविली. या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. त्यांच्या प्रेमाला पीडितेच्या घरच्यांचा विरोध होता; मात्र पीडिता ही घरच्यांना आत्महत्या करण्याची धमकी देत होती.

हे ही वाचा 
सासरच्यांनी सुनेला अन् तिच्या बॉयफ्रेंडला नको त्या अवस्थेत पाहिलं; अन् पुढे धक्कादायक घडलं...

दि. 31 जुलै 2024 ते 21 ऑगस्ट 2025 या काळात ती गर्भवती झाली. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिल्याने ती अल्पवयीन असताना बाळंतीण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group