सासरच्यांनी सुनेला अन् तिच्या बॉयफ्रेंडला नको त्या अवस्थेत पाहिलं;  अन् पुढे धक्कादायक घडलं...
सासरच्यांनी सुनेला अन् तिच्या बॉयफ्रेंडला नको त्या अवस्थेत पाहिलं; अन् पुढे धक्कादायक घडलं...
img
वैष्णवी सांगळे
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह विहरीत फेकले.  धक्कादायक म्हणजे हत्या करून आरोपी पिता स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संजीवणी कमळे (वय १९ वर्ष) आणि  लखन बालाजी भंडारे (वय १९) अशी मयतांची नावे आहेत. 

हे ही वाचा 
आजचे राशिभविष्य ! २६ ऑगस्ट २०२५ , आजचा वार मंगळवार ; आज तणावातून सुटका की ताण वाढणार ? वाचा

एक वर्षापूर्वी गोळेगाव येथील सुधाकर कमळे या मुलासोबत संजीवनीचा विवाह मोठ्या थाटात झाला होता. मात्र विवाहापूर्वी पासूनच संजीवनीचं लखन भंडारे या तरुणावर प्रेम होत. लग्नानंतर ही दोघांमध्ये जवळीक होती. सोमवारी संजीवनीच्या सासरचे मंडळी बाहेर गेल्याने संजीवनीने प्रियकराला घरी बोलवले. दरम्यान पती आणि सासरच्या मंडळी अचानक घरी परतली आणि संजीवनी आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत बघितले. त्यानंतर संजीवनीच्या पतीने सासऱ्यांना फोन करून बोलावले आणि मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितले. 

हे ही वाचा 
ट्रम्प यांच्या टॅरिफचा धसका ! टॅरिफ बॉम्बच्या भीतीनं शेअर बाजार कोसळला

मुलीचे कुटुंबीय वडील, काका आणि हे तिघे जण मुलीच्या सासरी गोळेगावला पोहचले. आरोपींनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला घेऊन जातं असताना करकाळा शिवारात दोघांना मारहाण केली त्यानंतर त्यांची हत्या केली, त्यानंतर चाळीस फूट खोल असलेल्या विहरीत दोघांचे मृतदेह फेकून दिले. घटनेनंतर मुलीचे वडिल मारोती सुरणे हे उमरी पोलीस ठाण्यात पोहचले आणि मी मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारहाण करुन त्यांचा मृतदेह करकाळा शिवारातील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत फेकून दिला अशी माहिती दिली. 

दरम्यान पोलीस आरोपीला घेऊन घटनास्थळी पोहचले. सायंकाळी सात वाजता मुलीचे प्रेत बाहेर काढण्यात आले तर मुलाच्या प्रेताचा शोध सुरूच आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group