पेठ - पेठ तालुक्यातील उत्तरेकडील भागात काल सायंकाळी झालेल्या वेगाच्या वा-याने व जोरदार पावसाने अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले संसार पाण्याखाली उघड्यावर पडले.तालुक्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .
माळेगांव, काळुणे, आसदनपाडा आमडोंगरा महाविहीर, म्हसगण,विरमाळ, पाहुचीबारी आदी परिसरात अतिवृष्टी वादळ झाल्याने मोठ्या प्रमाणात घरांचे छप्पर उडून गेले घरातील धान्य व संसार उपयोगी वस्तु पावसाच्या पाण्यात भिजुन संसार उघड्यावर पडले दरम्यान जेथे निवारा मिळेल तिथे कुटुंबानी आसरा घेतला.
शेतक-यांच्या मळ्यातील झाडे व घराचे छप्पर उडाले शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विजेचे पोलही जागोजागी कोलमडून पडल्याने लाईट बंद झाली आहे .
शेतक-यांच्या विहीरी व बोरवेलवर बसविलेले सोलर पॅनल वादळी वा-याने उडवून सोलर पॅनलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.नरहरी झिरवाळ यांनी अतिवृष्टी व वादळ वा-यात नुकसान झालेल्या शेतकरी व घरांचे नुकसान झालेल्यांना भेटी देत संपूर्ण नुकसान ग्रस्त भागाचा दौरा करत नुकसानग्रस्तांना धिर देत प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.
दौ-या दरम्यान युवा नेते गोकुळ झिरवाळ, जेष्ठ नेते रामदास गवळी,विलास अलबाड ,महेश टोपले,दिलीप भोये, गोपाल देशमुख,पुंडलिक सातपुते ,गौरव चौधरी ग्रामपंचायत अधिकारी,महसूल अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.