Nashik Rain update : नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट; गडावर जाणा-या भाविकांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले
Nashik Rain update : नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट; गडावर जाणा-या भाविकांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले "हे" आवाहन
img
दैनिक भ्रमर

नाशिक: भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यास आज व उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  नागरिकांनीही सतर्क रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहेत. 

जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, उपविभागीय अधिकारी (SDO), तहसिलदार तसेच तलाठी, ग्रामसेवक, आणि पोलीस पाटील यांच्यापर्यंत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे.     
      
जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतत तालुक्यातील अधिका-यांशी संपर्कात आहेत.  आवश्यकता भासल्यास, नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणाना देण्यात आल्या आहेत. 

गडावर जाणा-या भाविकांनी विशेष दक्षता घ्यावी

सध्या नवरात्र उत्सव सुरू आहेत. वणी गडावर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. गडावर गर्दीचे नियंत्रण होण्यासाठी प्रशासन आवश्यक उपाययोजना राबवित आहेत. भाविकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहेत.  

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पाऊसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.  धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी नदीनाल्यांना पुर आलेला आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, रस्ते, पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओल॔डू नये. 

जिल्ह्यातील नद्यांना पूर आलेला असल्याने नदीकाठावरील नगरिकांनी सतर्कता बाळगावी. शेतकऱ्यांनी आपली जनावरे तसेच शेतीचे साहित्य सुरक्षितस्थळी हलवावे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असून, कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये.

नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सुरक्षित ठिकाणी राहावे, जुन्या किंवा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या प्रशासकीय कार्यालयाशी किंवा मदत केंद्राशी संपर्क साधावा. असे आवाहनही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहेत.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group