नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिक रोड भागातील जय भवानी रोड वरील लोणकर मळा, पाटोळे मळा येथे दोन बिबट्या संध्याकाळ च्या सुमारास मोकाट फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकरोड भागातील जयभवानी रोड वरील मळे भाग, लॅम रोड वरील हॉटेल लोटस मागील भागात तसेच वडनेर गेट तसेच भागात दिवसा रात्री बिबट्या मोकाट फिरताना दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी आर्टलरी सेंटर भागात बापासमोर आपल्या लाडक्या दोन वर्षीय मुलाला उचलून नेऊन त्याची हत्या केली.
त्यामुळे वन विभागाला सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केले आहे. वन विभागाने याचा धसका घेऊन ज्या बिबट्याने मुलाला उचलून नेऊन त्याची हत्या केली त्याला ठार करण्याची परवानगी वनविभागाला दिली आहे.
यावर मंथन सुरू असताना आज संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास लोणकर मळा व पाटोळे मळा येथे दोन वेगवेगळे बिबटे फिरताना आढळून आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने शेतकरी, नागरिक मध्ये दहशत वातावरण निर्माण झाले आहे. वन अधिकारी सदर भागात पाहणी करणार आहे.