पेठ - नाशिक पेठ गुजरात या राष्ट्रीय महामार्गावर सावळघाट व कोटंबी घाटातील रस्त्यावरील पडलेली मोठ मोठी जीवघेणी व अपघाती खड्डे यामुळे या महामार्गावर वारंवार वाहतुकीचा खोळंबा व अपघात होवून रस्ता बंद होवुन प्रवाशांसह वाहन चालकही बेजार झाले आहेत.
त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणुन दगड माती मुरुम भरून खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याने वाहन चालक व प्रवाशांना दिलासा मिळत आहे.