आताच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं सरकारला कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता.
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती. माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती, मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता कृषिमंत्री माणिकराव काकाटे यांचे खाते बदलण्यात आले आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेले कृषी खातं आता दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून, माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे.