कॉपीराइट कायद्याअंतर्गत दिंडोरीत एका एजन्सीवर कारवाई
कॉपीराइट कायद्याअंतर्गत दिंडोरीत एका एजन्सीवर कारवाई
img
चंद्रशेखर गोसावी

जऊळके दिंडोरी येथील मे. शिवाय एजन्सी या वंगण तेल घाऊक विक्री करणाऱ्या गोदामात प्रतिलिपी कायद्याचे उल्लंघन होणाऱ्या मालाचा साठा असल्याबाबत ठोस पुरावा उपलब्ध झाल्याने नाशिक येथील त्या स्वामित्व हक्क प्राप्त उद्योजक संजय सोनवणे आणि कंपनीच्या ॲडमिन  मॅनेजर शीतल ठाकरे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली.


या तक्रारीची त्वरित दखल घेऊन या संदर्भात संपूर्ण शहानिशा करून दिंडोरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस हवालदार सुमित सदाशिव आवारी यांचे पथक नेमुन 10 वा मैल मुंबई आग्रा हायवे येथील मोठ्या गोडाऊनमध्ये दि. ९ ऑगस्ट रोजी तपासणी केली.

 त्यावेळी शिवाय एजन्सी यांच्या कडे असलेले अनेक पॅकिंगवर या आधीच वापरात असलेले तसेच रजिस्टर केलेले व्यापार चिन्ह तसेच प्रतिलिपी चिन्ह सारखे माल आढळून आला.

यात  लोगो मधील काही मजकूर वापरून रजिस्टर मार्क सारखा साधर्म्य असलेला मार्क वापरून रजिस्टर मार्कला नुकसान होईल अशी कृती करत असल्याने त्यांच्यावर भारतीय कॉपीराइट कायदा 1957, भारतीय दंड संहिता अनुसार दिंडोरी पोलिस ठाण्यात जितेंद्र अग्रवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कॉपीराइट, स्वामित्व हक्क, ट्रेड मार्क याचा गैर वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे सर्व संबंधित यंत्रणा यांनी त्वरित कारवाई करावी या साठी निर्देश दिले आहेत.

या संदर्भात अधिक तपास रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस हवालदार सुमित सदाशिव आवारी हे करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group