नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): वडनेर दुमाला गावात शुक्रवारी (८ ऑगस्ट) रात्री साडेतीन वर्षीय आयुष किरण भगत या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला.
या हल्ल्यानंतर त्याला ओढत नेण्यात आले होते. रात्रीपासून सुरु असलेल्या शोधमोहीमेनंतर त्याचा मृतदेह रात्री बारा वाजेच्या सुमारास गावालगत ५०० ते ७०० मीटर अंतरावरील उसाच्या मळ्यात आढळून आला.
वनविभागाने ड्रोनच्या साह्याने व्यापक शोधमोहीम राबवली होती. या मोहिमेमध्ये उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे श्वान पथक (डॉग स्कॉड), गुगल श्वान, स्थानिक लोकप्रतिनिधी, गावकरी युवक, आणि वनविभागाचे अधिकारी सक्रिय सहभागी होते.
शोधादरम्यान घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराजवळ रक्ताचे डाग व थोड्या अंतरावर मुलाची पॅन्ट आढळून आली होती. त्यानंतर तातडीने व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. या गावात या मोहिमे गावकरी तसेच माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम कोठुळे आदी सह वडनेर गेट वडनेर गाव कारगिल गेट विहित गाव परिसरातील युवकांचा मोठा सहभाग होता.
घटना घडल्यापासून रात्री उशिरापर्यंत युवक जात्या- जात्याने वालदेवी नदी किनार,मळे भाग तर ओसाड रानात जीवाची परवा न करता आयुष्यात शोध घेत होते मात्र दुर्दैवाने त्याचा मृतदेह हाती लागल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. किरण भगत हे खाजगी कंपनीत काम करीत असतं त्यांना एक मुलगी आणि आयुष हा मुलगा आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याची लाडकी बहीण कोणाला राखी बांधेल? हा प्रश्न डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहत नाही. आयुष्याचा मृतदेह पाहतात अनेकांचे डोळ्याच्या कडा पाणवल्या पोलीस पंचनामा करून त्याचा मृतदेह उतरणीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
या दुर्दैवी घटनेने वडनेर दुमाला परिसरात भीतीचे व धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या बिबट्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाकडे ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.
ड्रोन ची मदत...
घटना घडल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ड्रोन च्या मदतीने आयुष्यात शोध सुरू केला. त्याच्या घरापासून 500 ते 700 फुटावर उसाच्या मळ्यात आयुष आणि बिबट्या असल्याचे संकेत ड्रोन ने दिल्यानंतर शोधकार्यातील युवक,वनाधिकारी, पोलीस येथे पोहोचले.
त्यावेळी अवघ्या दहा फुटावर बिबट्या असल्याचे ड्रोन चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वांना सावध केले.