मनमाड कृउबात अविश्वास प्रस्तावापूर्वीच नवा ट्विस्ट
मनमाड कृउबात अविश्वास प्रस्तावापूर्वीच नवा ट्विस्ट
img
दैनिक भ्रमर
 
मनमाड (प्रतिनिधी) :- गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी आज शुक्रवारी (दि. ८) सकाळी समितीच्या कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मात्र, हा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच या प्रकरणात आणखी एक द्विस्ट आला असून, सभापती दीपक गोगड यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने नव्यानेच नियुक्त करण्यात आलेले स्वीकृत संचालक रमेश कराड यांना आज होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यास व मतदान करण्यास मनाई केल्याची माहिती समोर आल्याने आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यमान सभापती दीपक गोगड यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याने प्रशासनाने ८ ऑगस्ट रोजी विशेष सभा बोलावली आहे. सध्या सत्ताधारी गटाकडे सहा तर विरोधी गटाकडे बारा संचालक आहेत. त्यामुळे प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता वाढली होती.

मात्र, गोगड यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि रमेश कराड या नव्याने स्वीकृत केलेल्या संचालकाला ८ ऑगस्टच्या बैठकीत मतदान करण्यास व उपस्थित राहण्यास मनाई करणारा आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती समोर आले असून रमेश कराड यांची नियुक्ती १८ जुलै रोजी झालेल्या सभेत करण्यात आली होती. दरम्यान सभापतींवरील अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी विरोधी गटाकडून सर्व शक्यतांचा वापर होण्याची चर्चा होत आहे.

मतदानावेळी विरोधी गटाची जादू चालली नाही तर हा प्रस्ताव रद्द होईल आणि पुढील सहा महिन्यांपर्यंत नवीन अविश्वास प्रस्ताव दाखल करता येणार नाही.यामुळे आज शुक्रवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group