नाशिक : खंडणी देण्यास नकार दिल्याने ट्रान्सपोर्ट मालकाला धमकी
नाशिक : खंडणी देण्यास नकार दिल्याने ट्रान्सपोर्ट मालकाला धमकी
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : पाच हजार रुपयांची खंडणी देण्यास नकार दिला, म्हणून ट्रान्स्पोर्टचालकाचे ऑफिस जाळण्याची व जिवे मारण्याची धमकी देणार्‍या त्रिकूटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संजय शिवनारायण राठी (रा. उमियाशक्ती अपार्टमेंट, काठे गल्ली) यांचे द्वारका येथे चंद्रभागा कॉम्प्लेक्समध्ये गोपी ट्रान्स्पोर्ट नावाचे ऑफिस आहे. आरोपी सोनू सुरेश पवार (रा. महालक्ष्मी चाळ, नाशिक), अजय राजू गणगे (रा. नानावली, जुने नाशिक), दीपक सुभाष माळी यांनी अनधिकृतपणे राठी यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला व फिर्यादीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.

सावधान ! ३0 हजार रुपये प्रतितोळा दराने सोने अन... मोठी फसवणूक

पैसे देण्यास नकार दिला म्हणून तीनही आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची व ऑफिस जाळण्याची धमकी दिली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group