त्र्यंबकेश्वर (भ्रमर वार्ताहर):- त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी नितीन पवार, योगेश लोखंडे यांची तर तज्ज्ञ संचालकपदी आशुतोष महाजन त्यांची निवड करण्यात आली. यावेळी संचालक मंडळाच्यावतीने तिघांचा सत्कार करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर सोसायटीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेअरमन लक्ष्मीकांत थेटे, व्हा. चेअरमन आरती अडसरे, संचालक सुरेश गंगापुत्र, उमेश सोनवणे, निवृत्ती कोठुळे, पंढरीनाथ कडलग, बहिरु कोठुळे, अरुण दाते, मोहन लोहगावकर, कैलास चोथे, अंजुबाई गंगापुत्र, कृउबाचे संचालक युवराज कोठुळे, किरण अडसरे, सचिव रामदास महाले, क्लार्क ज्ञानेश्वर आहेर, मनोहर महाले, गणेश कोठुळे, रवींद्र सोनवणे, प्रवीण शिरसाठ, कल्पेश कदम, दिलीप माळी, लालचंद चव्हाण आदी उपस्थित होते.