नाशिक - उत्तराखंडमध्ये झालेल्या जलप्रलयामध्ये नाशिक मधील सात जणांशी अद्यापपर्यंत संपर्क होऊ शकलेला नाही. प्रशासन त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलत आहे.
उत्तराखंडमध्ये काल झालेल्या जलप्रलयामध्ये राज्यातील 51 नागरिक अडकले असल्याचे समोर आले होते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सात नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये नाशिक शहरातील दीपक कोतकर, शुभांगिनी कोतकर, शौनक कोतकर, शार्विल कोतकर, तर मालेगाव मधील सुरेश येवला, नयना येवला, अनिकेत येवला यांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत असून अद्यापपर्यंत त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांचे परिवार देखील त्यांच्याशी संपर्क साधत आहेत परंतु तो झालेला नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हा आपत्ती विभागाच्या वतीने देखील आपत्ती निवारण अधिकारी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नागरिकांची माहिती गोळा केली जात आहे.