प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक
img
दैनिक भ्रमर

नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना आज सकाळी गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

कारडा यांनी चेक बाऊन्स केल्याने त्यांच्याविरुद्ध उत्तरप्रदेशच्या गौतमनगर न्यायालयाने 4 अटक वॉरंट जारी केले होते. हे नॉनबेलेबल वॉरंट असल्याने त्यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. कारडा हे फरार असल्याने व ते मोबाईल वापरत नसल्याने त्यांचा शोध घेणे कठीण होते. 

गुंडाविरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, कारडा हे आज द्वारका जवळील कांदा बटाटा बटाटा भवन येथे येणार आहेत. त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्या परिसरात सापळा रचून त्यांना अटक केली. कारडा यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गौतम नगर न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group