नाशिकला मिळणार आता 1 नवीन पोलीस ठाणे
नाशिकला मिळणार आता 1 नवीन पोलीस ठाणे
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक - नाशिक पोलीस आयुक्तालयात सातपूर आणि अंबड या दोन्हीही पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात आले असून आता नव्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून उद्योजकांची मागणी देखील पूर्ण झालेली आहे. 

नाशिक महानगरपालिकेची स्थापना 1982 साली झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तालयाची स्थापना ही 19 नोव्हेंबर 1990 साली झाली होती. त्यावेळी सात पोलीस स्टेशन होते. कालांतराने लोकसंख्या वाढल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्याचे विभाजन करून म्हसरूळ आणि आडगाव अशी दोन पोलीस ठाणी तयार करण्यात आली.

तर पुढे अंबड पोलीस करण्याचे विभाजन करून इंदिरानगर पोलीस ठाणे करण्यात आले. वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेऊन सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली तर शहरातील गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून गुन्हे शाखेच्या शाखा करण्यात आल्या.

या नव्याने निर्माण होणाऱ्या पोलिस ठाण्यात आता नव्याने 181 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून त्यात 4 पोलीस निरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 15 पोलीस उपनिरीक्षक, 14 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 49 पोलीस हवालदार, 93 पोलीस शिपाई आणि बाह्य यंत्रणेद्वारे 2 सफाई कर्मचारी यांचा समावेश असणार आहे.

नाशिक शहराची मोठी वाढ झाली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या व वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group