नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): अनेक दिवसा पासून राजकीय नेते ज्याची वाट पाहत होत्या त्या जिल्हा परिषद व मनपा निवडणुकी चा बार ऑक्टोबर शेवटी दिवाळी नंतर उडण्याची दाट शक्यता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आढावा बैठकेचे आयोजन करण्यात आले. नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन आयुक्त वाघमारे यांनी विभागातील मतदार,नव मतदार, केंद्र, निवडणूक निर्णय अधिकारी नेमणे याबाबत माहिती घेण्यात आली.
हे ही वाचा !
मनपा मध्ये एका प्रभागात चार उमेदवार राहणार असून मतदान साठी लागणारे EVM मशीन मध्य प्रदेश मधून येणार असून याबाबत त्या येथील राज्य सरकार सोबत चर्चा झाली असून एका प्रभागात एका पेक्षा जास्त उमेदवार असल्याने या निवडणुकीत VV पॅड राहणार नसून त्या ऐवजी काही बदल झाल्यास ते वेळेवर ठरवले जाईल असे आयुक्त वाघमारे म्हणाले.
या निवडणुकित एक जुलै २०२५पर्यंत नोंदीत मतदार असावे असा पत्र व्यवहार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले असल्याचे आयुक्त वाघमारे म्हणाले