गंजमाळला दोन वाहने जाळली
गंजमाळला दोन वाहने जाळली
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मागील भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाने दोन वाहनांना आग लावून त्यांचे नुकसान करून घर जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अन्सार निसार शेख (रा. गंजमाळ, भद्रकाली) हे रिक्षाचालक आहेत. त्यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वी आरोपी सोनू बेग (रा. गंजमाळ) याच्याशी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून फिर्यादीचे आर्थिक नुकसान व्हावे, यासाठी त्यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या एमएच बीक्यू 1762 या क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा व एमएच 15 एचएफ 3753 या क्रमांकाची उभ्या असलेली ज्युपिटर गाडी यांना आग लावून त्या जाळून त्यांचे नुकसान केले, तसेच आरोपी बेग याने हातातील पेटलेली बाटली फिर्यादीच्या घराकडे फेकून घर जाळण्याचादेखील प्रयत्न केला.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सोनू बेगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group