९ सायकलिस्टने पूर्ण केली १२०० किलोमीटरची सायकलिंग ब्रेवे राईड;  रात्री १ वाजता मित्र आणि कुटुंबीयांनी जोरदार केले स्वागत
९ सायकलिस्टने पूर्ण केली १२०० किलोमीटरची सायकलिंग ब्रेवे राईड; रात्री १ वाजता मित्र आणि कुटुंबीयांनी जोरदार केले स्वागत
img
दैनिक भ्रमर
नाशिक : १२०० किलोमीटरची सायकलिंग ब्रेवे राईड ९ सायकलिस्टने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

नाशिक- इंदोर मार्गे - भोपाळला जाऊन परत नाशिक असा राईडचा मार्ग होता. गुरुवारी सकाळी नाशिकमधील महिला डॉक्टरसह कलकत्ता, मुंबई आणि नाशिक येथील 11 सायकलिस्ट वीरांनी बाराशे किलोमीटरच्या सायकलिंग ब्रेवेला भर पावसात सुरुवात केली. संपूर्ण राईड ही 90 तासांमध्ये पूर्ण करायची असते. यामध्ये झोपेचे नियोजन, खाण्यापिण्याची वेळ आणि सायकल रिपेअर करण्यासाठीचा वेळ सर्व एकत्रित समाविष्ट असतो.

आज (दि. ६) पहाटे 1 वाजेपर्यंत ही राईड पूर्ण करण्यासाठी वेळ होती. हे सर्व सायकलीस्ट पुढच्या महिन्यात आयोजित केलेल्या 1400 kms प्रतिष्ठेच्या लंडन -एडिनबर्ग -लंडन मध्ये सहभागी होणार आहेत. त्यासाठी ही राईड सराव म्हणून अतिशय महत्त्वाची होती. 2 सायकलस्वार डॉ. अनिता लभडे आणि हरिहरन सुब्रमण्यन वगळता सर्व सायकलस्वार यांनी ही राईड पूर्ण केली. त्यांनी अनुक्रमे एकाधिक पंक्चर आणि आरोग्याच्या कारणांमुळे ही राईड अर्ध्यावर सोडली. 

नाशिक ते भोपाळ, उत्तर-पश्चिम या मार्गाची दिशा मान्सूनच्या वाऱ्यांची होती.  त्यामुळे धुळे-इंदौर-भोपाळला जाताना पाठीमागून येणाऱ्या वाऱ्याने रायडर्सना साथ दिली, पण समोरून येणाऱ्या वारामुळे थकवा आणि झोप न लागल्यामुळे सायकल चालवण्याचा त्रास वाढला. रायडर्सना रात्रंदिवस सायकल चालवावी लागली, कमी दृश्यमानता आणि खराब रस्त्यांमुळे पावसात रात्री सायकल चालवणे अवघड होते. सेफ्टी लाइट्स, रिफ्लेक्टर, हेल्मेटसाठी संपूर्ण भारतभर या ब्रीव्हट्स चालवणं अनिवार्य आहे. 3 रात्रींसाठी आम्ही आयोजकांनी झोपेचा ब्रेक घेण्यासाठी हॉटेल्स बुक केली होती, परंतु रायडर्सना 3-4 तासांपेक्षा जास्त झोपण्याची सोय नसते, कारण राइड वेळेत पूर्ण करू शकत नाही.

शंतनू चक्रवर्ती, विजय काळे, रामदास सोनवणे, प्रशांत भावसार, डॉ राहुल सोनवणी, अद्वैत गाडगीळ, किशोर काळे, नानासाहेब पवार, योगेश भामरे यांनी ही राईड यशस्वीपणे पूर्ण केली. हर्षल पवार यांनी मार्शलिंगची जबाबदारी पार पाडली. डॉ. महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही राईड पार पडली. द्वारका येथे सर्व सायकलस्वारांचे रात्री १ वाजता मित्र आणि कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले. 
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group