नाशिक :- ५ लाखांची लाच मागून नंतर दीड लाख रुपयांची लाच घेताना खाजगी इसमासह सहाय्यक फौजदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
अशोक गायकवाड (खाजगी इसम वय 71, रा. बिशोब लॉइड कॉलनी सावेडी, जिल्हा अहिल्या नगर व राजेंद्र प्रभाकर गर्गे (वय 57, सहाय्यक फौजदार कोतवाली पोलीस स्टेशन, रा. समर्थ नगर, सावेडी, जिल्हा अहिल्यानगर अशी लाच
घेणाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे नोंद गांजाच्या केस मध्ये आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या मोबदल्यात कोतवाली पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांच्या करिता मध्यस्थी खाजगी इसम अशोक रामचंद्र गायकवाड यांनी दिनांक २०/०७ /२०२५ रोजी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती दीड लाख रुपये लाचेची मागणी केली.
या मागणीस सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी प्रोत्साहन दिल्याचे लाच मागणी कारवाईदरम्यान स्पष्ट झाले आहे. दिनांक १८/०८/२०२५ व २०/०८/२०२५ रोजी तक्रारदार यांना त्यांचे तक्रारीप्रमाणे पंचासह आरोपी यांचे लाच मागणी पडताळणीकरिता पाठविण्यात आले होते.
त्यावेळी आरोपी अशोक गायकवाड याने तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न होऊ देणे करिता सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांचे करिता तडजोडी अंती 150000 रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झालेले आहे. राजेंद्र गर्गे यांनी गायकवाड यांना लाच मागण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झालेले आहे
दिनांक २१/०८/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लाचेची रक्कम गायकवाड यांना देणे करिता गेले असता, आरोपींनी स्वतः तक्रारदार यांच्याकडून १,५०,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारली आहे.