नाशिक - देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदारांबाबत चुकीची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर देऊन नागरिकांमध्ये दिशाभूल करण्यात आली असल्याने संजय कुमार या राजकीय विश्लेषका विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने निवडणूक आयोगाने घेतलेल्या मतदानाविषयी वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे सध्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये झालेले मतदान यावरून मतदारांमध्ये वेगवेगळे निष्कर्ष ही व्यक्त केले जात आहे. या संभ्रमावस्थेमध्ये असतानाच आता नाशिकमध्ये देखील यामध्ये प्रश्न उपस्थित केले गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर नासिक जिल्ह्यातील देवळाली
विधानसभा मतदारसंघातून झालेल्या मतदानाबाबत तक्रार करण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत प्रविणा शेखर तडवी या नायब तहसीलदार असून त्यांनी निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय कुमार या व्यक्तीने केलेल्या तक्रारीची शहनिशा केली होती आणि त्यानुसार मिळालेली माहिती आणि उपलब्ध माहिती यामध्ये तफावत आढळल्यामुळे संजय कुमार यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . राज्यामध्ये पहिल्यांदीच अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे.
संजय कुमार यांनी वोट चोरी झाले असे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले होते आणि माफी देखील मागितली होती. यामुळे संजय कुमार यांच्या अडचणी वाढणार आहेत.