
२६ जुलै २०२५
नाशिकमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या पंडित कॉलनी मधील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये जवळपास दीड तास चार जण अडकले होते.
अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका कऱण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या मदतीनं लिफ्टचा दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढलं.जवळपास दीड तास तरुण लिफ्ट मध्ये अडकले होते. सध्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Copyright ©2025 Bhramar