
६ जुलै २०२५
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे.
गरजेनुसार वेळोवेळी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज सकाळी गंगापूर धरणातून 5186 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरीच्या पातळीतही वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Copyright ©2025 Bhramar