सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी; सातपूरला भावानेच केला भावाचा खून
सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी; सातपूरला भावानेच केला भावाचा खून
img
दैनिक भ्रमर

सातपुर-  सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगर परिसरात घरगुती वादातून सख्या भावाने धारदार हत्याराने वार करत खून केल्याची घटना घडली.
करण शिंगाडे (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी त्याचा भाऊ अर्जुन शिंगाडे याला ताब्यात घेतले आहे. माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर संतोषीमाता नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे, क्राईम पी.आय. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निहालदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप, पोलीस कॉन्स्टेबल राकेश रसाळ, सागर गुंजाळ व हवालदार विश्वास पाटील आदी सातपूर पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group