हवाई मालवाहतुकीत नाशिक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
हवाई मालवाहतुकीत नाशिक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- मे २०२५ मध्ये नाशिक विमानतळाने एकूण १,१४६ मेट्रिक टन आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करून देशभरात ११ वे स्थान मिळवले असून महाराष्ट्रात नाशिकने दूसरे स्थान पटकावले आहे.

नाशिकने आंतरराष्ट्रीय व्यापारात मालवाहतुकीच्या माध्यमातून स्वतः ची एक ओळख निर्माण केली असून देशाच्या अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

आतापर्यंत मेट्रो शहरांतच कार्गो वाहतूक मर्यादित होती. मात्र, आता नाशिकसारख्या शहरांकडूनही देशाच्या निर्यात क्षमतेत भरीव योगदान दिले जात असल्याचे या आकडेवारीतून सिद्ध होत आहे.

योग्य धोरणात्मक पाठबळ मिळाल्यास नाशिक लवकरच कार्गो हब म्हणून उदयास येईल, असा मानस एव्हिएशन उपसमितीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group