नाशिक - म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आज दुपारच्या सुमारास तिथेच बांधकाम करणाऱ्या मजुरांना बिबट्या दिसल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.
ही बातमी त्वरित वन विभागाला कळविल्यानंतर या लगतच्या परिसरामध्ये वनविभागाने पाहणी केली. मात्र, आसपासच्या परिसरात कुठेच बिबट्याचे ठसे दिसले नसल्याचे वन विभागाने सांगितले. याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही मात्र वनविभागाच्या वतीने या परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
पुढील परिस्थिती बघून वनविभाग पिंजरा लावण्याबाबतचा निर्णय घेणार आहे. शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बिबट्या दिसल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाल्यानंतर वनविभागाने तातडीने या परिसरात धाव घेतली.
मात्र, पोलीस स्टेशन आणि लगतच्या परिसरामध्ये बिबट्याचे कोणत्याही प्रकारच्या खुणा उपलब्ध झालेल्या नाहीत अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे. परंतु तिथे सर्व झाडीचा परिसर आहे.
त्यामुळे तिथे बिबट्या असल्याची शक्यता नाकारता येत नसलताने वनविभागाने या परिसरातील नागरिकांना रस्त्यावर एकटे न फिरणे, जॉगिंग ट्रॅक वर पहाटे एकटे न फिरणाचा सल्ला दिला आहे. तसेच योग्य की काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे.