गंगापूर धरण व गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार दोन दिवसापासून सुरु आहे.
उद्या दिनांक 20/06/2025 रोजी सकाळी 6 वाजता गंगापूर धरण नदी पूर पाणी विसर्ग 500 क्यूसेस ने सोडण्यात येणार असून सकाळी 9 वाजता 1000 क्यूसेस करण्यात येणार आहे.
तसेच धरणातल्या पाणी आवकानुसार विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल, याची सर्वांनी काळीजपूर्वक नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज दि.19 रोजी गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे तालुक्यातील नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. गंगापूर धरण परीचालन सुची नुसार व धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे येणारा येवा बघता जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये विसर्ग प्रवाहित करणार आहे.
तसेच पुढील कालावधीत धरणामधील आवक बघून टप्याटप्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे. तरी गोदावरी नदीकाठच्या नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नदीप्रवाहात कोणीही जावू नये तसेच नदीकाठ लगतच्या आपली पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.