त्र्यंबकेश्वर-इगतपुरी तालुक्यात काँग्रेसला धक्का;
त्र्यंबकेश्वर-इगतपुरी तालुक्यात काँग्रेसला धक्का; "यांनी" केला भाजपात प्रवेश
img
दैनिक भ्रमर

देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्रला समर्थन देण्यासाठी त्रंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी  गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य श्रीमती शकुंतला डगळे, माजी सभापती गोपाळराव लहांगे, संतोष दगळे त्यांच्यासह काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, संघटन मंत्री रवी अनासपुरे  यांचा प्रमुख उपस्थितीत  जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली आज वसंत स्मृती कार्यालय, मुंबई येथे भारतीय जनता पार्टी  मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे  पदाधिकारी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group