नाशिक शहरात पहिल्यांदाच दिवसा कोम्बिंग ऑपरेशन;
नाशिक शहरात पहिल्यांदाच दिवसा कोम्बिंग ऑपरेशन; "इतके" सराईत गुन्हेगार जेरबंद
img
दैनिक भ्रमर
नाशिक शहरात प्रथमच दिवसा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व शाखा यांना अभिलेखावर असलेले सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे. यानुसार दि. २३ जुलै रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाणे व गुन्हे शाखा पथकांनी अचानकपणे दिवसा कोबिंग ऑपरेशन राबविले. या अचानक कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये धडकी भरली.

यानुसार एकुण १६६ सराईत गुन्हेगारांना आपआपल्या पोलीस ठाणे तसेच शाखा येथे आणुन त्यांच्याकडे कसुन चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्या घरझडत्या घेण्यात आल्या. पोलीस ठाणे निहाय कारवाई पुढील प्रमाणे.

१) आडगाव पोलीस ठाणे- १०,
२) पंचवटी पोलीस ठाणे-१०,
३) म्हसरूळ पोलीस ठाणे- १०,
४) भद्रकाली पोलीस ठाणे-१३,
५) सरकारवाडा पोलीस ठाणे-०८,
६) गंगापूर पोलीस ठाणे-१०,
७) मुंबईनाका पोलीस ठाणे-१०,
८) सातपूर पोलीस ठाणे-१०,
९) अंबड पोलीस ठाणे- १०,
१०) इंदिरानगर पोलीस ठाणे-१०,
११) उपनगर पोलीस ठाणे-१०,
१२) नाशिकरोड पोलीस ठाणे-१४,
१३) देवळाली कॅम्प पोलीस ठाणे-१०,
१४) चुंचाळे पोलीस चौकी- १०,
१५) गुन्हे शाखा युनिट-२-११,
१६) अंमली पदार्थ विरोधी पथक-१०
अशा एकुण १६६ सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले.

ही कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-१ श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-२ किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, पंचवटी विभाग, सरकारवाडा विभाग, अंबड विभाग, नाशिकरोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणेकडील प्रभारी अधिकारी यांनी संयुक्तपणे कारवाई केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group