बेपत्ता महिलेला शोधून सुखरूप केले कटुंबियांच्या स्वाधीन
बेपत्ता महिलेला शोधून सुखरूप केले कटुंबियांच्या स्वाधीन
img
Dipali Ghadwaje
सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी पालघर येथून बेपत्ता असलेल्या महिलेल्या आपल्या अथक प्रयत्नातून शोधून सुखरूप महिलेच्या कटुंबियांच्या स्वाधीन केल्याने पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सविस्तर घटना अशी कि,पालघर येथील विक्रमगड पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रकला महेश वाघमारे वय 26 वर्षीय महिला पालघर येथून मार्च महिन्यात बेपत्ता झाली होती. सदर महिलेची विक्रमगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.

या तपासकामी विक्रमगड पोलीस स्टेशनचे तपासपथक सातपूर पोलीस स्टेशन येथे आले असता सातपूर पोलीस ठाणे येथील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी तात्काळ आपल्या अथक परिश्रमातून  महिलेचा तपास सुरु केला.सदर महिला सातपूर श्रमिकनगर येथील आयटीआय कॉलनी येथे असल्याचे समजले. तेव्हा पवार यांनी महिलेची चौकशी केली असता महिलेची ओळख पटली अन तेव्हा महिलेला विक्रमगड पोलिस पथकाच्या ताब्यात देऊन सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केले.

सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी केलेल्या या विशेष कामगिरीमुळे महिलेच्या कुटूंबीयांनी आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group