देवळाली कॅम्प येथील शिंगवे बहुला गावातील घरावर लष्कराचे पॅराशुट ( ग्लायडर ) कोसळले मात्र यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
मात्र जवानास दुखापत झाली असून त्यास उपचारासाठी मिलीटरी हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. ज्या घरावर ग्लायडर कोसळले त्या घराचे नुकसान झाले आहे .मात्र ते संबंधित लष्करी युनिटचे अधिकाऱ्यांनी भरून दिले
लष्कराच्या नाईस राईट्स युनिटच्या वतीने लष्करी जवान पॅरा शुट (ग्लायडर) प्रशिक्षण घेत असतात नेहमी प्रमाणे काल दि २८ रोजी सकाळी १० वाजे दरम्यान प्रशिक्षण घेत असताना पॅरा शुट मध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पॅरा शुट सह जवान शिंगवे बहुला गावातील कौसाबाई चव्हाण यांच्या घरावर कोसळले.
यावेळी आजूबाजूचे नागरिक भयभीत झाले सदर घटना तातडीने लष्करी युनिटला समजतात त्या युनिटचे अधिकारी कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले घरावर पॅराशुट्स पडलेल्या जवानास स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित अधिकारी व जवान यांनी स्ट्रेचरच्या साह्याने ताबडतोब खाली उतरवले यास अधिकारी व जवान यांनी उपचारासाठी लष्कराच्या हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
मात्र इतर कुठलीही जीवीत हानी झाली नाही घराचे नुकसान झाले ते लष्करी अधिकाऱ्यांनी खर्च भरुन दिला आहे. यादरम्यान देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस ही देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
या संबंधाने लष्करांकडून कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याने पोलिसांनीही याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.