वीज पडून एक युवक भाजून गंभीर जखमी तर दुस-या युवकाला जोरदार विजेचा धक्का
वीज पडून एक युवक भाजून गंभीर जखमी तर दुस-या युवकाला जोरदार विजेचा धक्का
img
दैनिक भ्रमर

विष्णु बोरसे 

बोरगाव:-सुरगाणा तालुक्यात सकाळ पासूनच पावसाने जोर धरला होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेघ गर्जनानसह विजांच्या कडकडाटासह घाटमाथ्यावर घागबारी, उंबरपाडा (दि), सराड, हरणटेकडी, संजयनगर वटाबारी परिसरात जोरदार पाऊस झाला.

याच वेळी संजयनगर वारात टमाटे लागवड करीत असलेले धर्मराज देवराम गायकवाड रा.उंबरपाडा( दि) याच्यावर वीज पडल्याने उजव्या खांद्याला भाजून गंभीर जखमी झाला आहे. तर त्याचाच शेजारी काम करत असलेला युवक मनोज काशिनाथ चौधरी वय २१ रा. चिखली यास वीजेचा धक्का बसला. या दोघांना तातडीने बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

धर्मराजला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मनोज याच्यावर बोरगाव येथील  प्राथमिक आरोग्य  केंद्रात उपचार सुरु आहेत.दरम्यान धर्मराजचे काका यशवंत गायकवाड, आई मिनाबाई गायकवाड, भाऊ रोशन गायकवाड हे काही अंतरावर असल्याने ते विजेच्या धक्क्यापासून वाचल्याने जीव भांड्यात पडला. 

 या बाबत घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड यांनी  तलाठी हेमंत लहांगे यांना खबर दिली असून तहसिलदार रामजी राठोड यांनी जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास माहिती दिली आहे.तलाठी यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group