उत्तमनगरला पठ्ठ्याने
उत्तमनगरला पठ्ठ्याने
img
वैष्णवी सांगळे
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दिराने स्वत:चे आणि फिर्यादी महिलेचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पवननगर परिसरात घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी सुरेश पांडुरंग काळे (वय 45, रा. उत्तमनगर, पवननगर, नाशिक) आणि फिर्यादी हे एकाच इमारतीत खाली-वर राहतात. 

आरोपी सुरेश काळे याला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो काहीच कामधंदा करीत नसल्याने नेहमी दारू पिण्यासाठी नेहमीच नातेवाईकांकडे पैसे मागतो. पैसे न मिळाल्यास तो जिवे मारण्याची धमकी देतो. त्याने 2 ऑगस्ट रोजी त्याच्या मोठा भावाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. भावाने पैसे दिले नाहीत म्हणून त्याने भावाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. 4 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या दोन मुलांसमवेत घराच्या बाल्कनीत उभी होती. त्यावेळी आरोपी सुरेश काळेने फिर्यादी असलेल्या आपल्या वहिनीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. 

हे ही वाचा ! 
मोठी बातमी ! आणखी एका पाकिस्तानी हेराला पकडले, मोबाइलमध्ये सापडले महत्त्वाचे पुरावे

वहिनीने पैसे देण्यास नकार दिला. “तुम्ही खाली या. तुम्हाला जाळून मारून टाकतो,” असे सांगून भावाच्याच मोटारसायकलीमधून पेट्रोल काढून तो वरच्या मजल्यावर आला. त्याच्या भीतीने वहिनीने घराचे दार लावून घेतले. तेव्हा त्याने त्यांच्या दाराला लाथा मारून “मी आता सर्व बिल्डिंगला आग लावून तुम्हाला जाळून मारून टाकतो,” असे सांगून तो खाली निघून गेला. थोड्या वेळाने काही तरी जळाल्यासारखा वास येऊन महिलेला धूर येत असल्यासारखे दिसले. सुरेशने खरंच घर पेटवले, हे लक्षात येताच महिलेच्या मुलाने पोलीस व अग्निशमन दलाला याबाबत कळवून ते घराबाहेर पडले. 

हे ही वाचा ! 
आश्चर्यच ! बँक खात्यात जमा झाले 1,00,13,56,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299 इतके रुपये

त्यावेळी लगेच महिलेचा जेठ तेथे आला व त्याने घराचे कुलूप तोडले. तोपर्यंत पूर्ण घराला आग लागलेली होती. या आगीत घराच्या सामानाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सुरेश काळे विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरेश काळेविरुद्ध यापूर्वीही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी 4 ऑगस्ट रोजी रात्री त्याला अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी करीत आहेत.





इतर बातम्या
Join Whatsapp Group