मनमाडला 5 वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी दिला चोप
मनमाडला 5 वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी दिला चोप
img
दैनिक भ्रमर

मनमाड (प्रतिनिधी) :- शहरातील मालेगाव नाका नजीक असलेल्या सिकंदर नगर भागात एका ५ वर्षीय मुलीला उचलून घेऊन अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला सतर्क नागरिकांनी चोप देऊन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिल्याची घटना घडली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात विविध कलमान्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव चौफुली नजीक असलेल्या नांदगाव रोडवरील सिकंदर नगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सिकंदर नगर येथील रिक्षा स्टॉप येथून पाच वर्षीय मुलगी आणि भावाची मुलगी हे दूध घेण्यासाठी दुकानात गेले होते.

त्यावेळी नबा ज्योतीदास, (वय २८, रा. रामपुर ता. नैभी, जि.लखीमपूर, आसाम) आणि दोन अनोळखी इसमांनी अज्ञात कारणासाठी अपहरण करून मुलीला पळून घेऊन जात होते असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव करीत आहे.दरम्यान या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची कसून तपासणी करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

शहरातील पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे सिकंदर भागातील जागरूक आणि सतर्क नागरिकांमुळे अपहरणाचा प्रकार थांबला. - खालीद शेख, समाजसेवक

इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group