Nashik : इंदिरानगर उपकेंद्रासोबत
Nashik : इंदिरानगर उपकेंद्रासोबत "या" भागातही उद्या विद्युत पुरवठा बंद राहणार
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ मधील द्वारका शाखा अंतर्गत असलेल्या ३३/११ केव्ही टाकळी उपकेंद्र येथून निघणारे ११ केव्ही उत्तरा नगर,  पूणे रोड या वाहिनीवरील तसेच राणेनगर शाखा अंतर्गत असलेल्या पाथर्डी उपकेंद्र येथून निघणाऱ्या ११ केव्ही  राजीव नगर व  इंदिरानगर या विद्युत वाहिन्यांचे बदल व देखभाल दुरुस्तीच्या कामाकरीता शनिवारी ३१ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे.

या कामाकरिता खालील प्रमाणे भागातील वीज पुरवठा बंद असणार आहे - राणे नगर कक्ष अंतर्गत असलेला भाग यामध्ये अशोका मार्ग, कल्पतरू नगर लेन नंबर १, २ व ३ गणेश बाबा नगर, रविशंकर मार्ग, पायनर हॉस्पिटल, सुविचार हॉस्पिटल व परिसर याचा समावेश आहे.

तसेच द्वारका कक्ष अंतर्गत यामध्ये भारत इन्कलेव सोसायटी, गुरुगोविंद सिंग कॉलेज, सराफ नगर, कैलास नगर, आदित्य हॉल परिसर, सिमेन्स कॉलनी, सदिच्छा नगर, वनवैभव कॉलनी, सुदर्शन लॉन्स व परिसर, राजीव नगर, श्रद्धा विहार व श्रद्धा  गार्डन, इंदिरानगर या भागाचा समावेश आहे.

ग्राहकांना योग्य दाब तसेच अखंडित सेवेसाठी दुरुस्तीची ही कामे करण्यात येणार असून, दिलेल्या वेळेपुर्वी काम पुर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल अथवा वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब होऊ शकतो.याची  वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी व कृपया सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group