देवळालीगाव रोकडोबावाडी येथे पाण्याच्या बादलीत पडून दहा महिन्याच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
देवळालीगाव रोकडोबावाडी येथे पाण्याच्या बादलीत पडून दहा महिन्याच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- खेळता खेळता पाण्याच्या बादलीमध्ये पडल्याने दहा महिन्याच्या बालकाचा दुर्दैव मृत्यू झाला. या प्रकाराने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे

देवळालीगाव,रोकडोबा वाडी येथील मस्जिद जवळ राहणारे अजय तायडे यांचा दहा महिन्याचा मुलगा रोशन काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरात खेळत असताना पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये तो पडला. त्यावेळी त्याची आई स्वयंपाक करत होती आणि बाळ खेळत असल्याचे समजून ती आपल्या कामात होती. मात्र काही वेळाने रोशन कुठे दिसत नाही, म्हणून शोध घेत होती.

शोध घेत असताना घरातच ठेवलेल्या पाण्याच्या भरलेल्या बादली मध्ये रोशन पडलेला आढळून आला. तत्काळ त्यास त्याचे आजोबा बिटको रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. उगले यांनी त्याला तपासून त्याला मृत घोषित केले. ही घटना मदरसा मशीद परिसरातील रोकडोबा वाडी येथे घडली. 
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group