नासिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) :- वडनेर कारगिल गेट येथील श्रुतीक गंगाधर या दोन वर्षाच्या लेकराला बिबट्याने ऑर्टलरी सेंटर मधील अंगणात खेळत असताना हल्ला करून घेऊन गेल्याची घटना घडली असून यामुळे शहरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
एक ते दीड महिन्यापूर्वी या भागातील आयुष भगत या तीन वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला उसाच्या मळ्यात त्याच्यावर जीवघेणा हल्ला करत घेऊन गेला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडल्या वर संपूर्ण शहरात वन विभागाच्या विरोधात प्रचंड संताप निर्माण झाला होता.
स्थानिक नगरसेवक केशव पोरजे,जगदीश पवार तसेच स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी गावकरी यांनी वन विभागावर भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता. अनेक मान्यवरांनी आयुष च्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन
करून वन विभागाला फैलावर घेतले होते.
मात्र आज रात्री दहा वाजेच्या सुमारास आर्टलरी सेंटर,कारगिल गेट मधील जवानाच्या दोन वर्षाच्या
श्रुतीक गंगाधर या मुलाला अंगणात खेळत असताना बिबट्या ने त्याच्यावर हल्ला करून त्याला वालदेवी नदी नजीक असलेल्या मोठ्या जंगलात घेऊन गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
पुन्हा एकदा येथील ग्रामस्थ अर्टलरी सेंटर मधील जवान व शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत हळहळ व्यक्त करीत आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी सुमित निर्मळ यांनी घटनास्थळी भेट दिली असून विशिष्ट पद्धतीचे ड्रोन च्या माध्यमातून या बालकाचा शोध सुरू आह. वडनेर गेट, वडनेर गाव, विहित गाव व पंचक्रोशीतील जवळपास दोन ते पाच हजार नागरिक, युवक या बालकाचा शोध घेताना दिसून येत आहेत.