नाशिकमध्ये
नाशिकमध्ये
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- स्मार्ट सिटी कंपनीमार्फत फलॉमिटर बसविण्याचे कामे प्रस्तावित असुन त्याचप्रमाणे नाशिक मनपा क्षेत्रातील शहरातील पाणी पुरवठा विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करावयाची आहेत.

त्यामुळे पाणी वितरण शट डाऊन शनिवार दि.२० रोजी नियोजित केले आहे.   त्याअंतर्गत महत्वाची खालील नमुद कामे करणे आवश्यक आहे. 

नाशिक पुर्व
१) नाशिक पूर्व प्रभाग क्र. १४ येथील कालिका जलकुंभ भरणारी ५०० मि.मी. व्यासाची गुरुत्ववाहिनी व्हॉल्व बदलणे - (स्मार्ट सिटी).
२) नाशिक पूर्व प्रभाग क्र. १४ येथील कालिका जलकुंभ भरणारी ५०० मि.मी. व्यासाची वितरण वाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्त करणे - (मे. देविदास देशमुख).
३) नाशिक पूर्व प्रभाग क्र. २३ येथील अशोक स्कूल समोरील ४०० मि.मी. व्यासाच्या वितरण वाहिनीवर नवीन एअर व्हॉल्व बसविणे. ( मे. शेलार)
४) नाशिक पूर्व प्रभाग क्र. २३ येथील गांधीनगर जलकुंभ १,२,३ आणि ४ वरील   वितरणवाहिनीवर व्हॉल्व व फ्लोमीटर बसविणे - (स्मार्ट सिटी).

नाशिक रोड
१) भीम नगर जलकुंभ १ - इलनेट व्हॉल्व, फ्लॉ मिटर व आऊटलेट व्हॉल व फ्लॉ मिटर दुरुस्ती करणे.
२) भीम नगर जलकुंभ २ -  इलनेट व्हॉल्व, फ्लॉ मिटर दुरुस्ती करणे.
३) शिव शक्ती नगर जलकुंभ - इलनेट व्हॉल्व, फ्लॉ मिटर  दुरुस्ती करणे.
४) पवार वाडी जलकुंभ १ -   व्हॉल्व, फ्लॉ मिटर  दुरुस्ती करणे.
५) पवार वाडी जलकुंभ २ -   व्हॉल्व दुरुस्ती करणे.

नविन नाशिक  विभाग
भवानी माता जलकुंभाचे काम

जन्म-मृत्यू प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय ; आता 'या' लोकांचं प्रमाणपत्र होणार रद्द

सातपुर
१२०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईनवर तीन ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

वरील कामे करण्यासाठी २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. ही कामे शनिवार दि.२० रोजी शट डाऊन दरम्यान करता येणार आहेत. पाणी पुरवठा वितरण व यांत्रिकी विभाग या दोन्ही विभागांची कामे करण्यासाठी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा शनिवार दि. २० रोजी संपुर्ण दिवस  बंद ठेवण्यात येणार आहे.

रविवार दि. २१ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Nashik :

Join Whatsapp Group