नाशिक :- दुबई प्रवासासाठी विमानाचे बनावट तिकीटे काढुन चौधरी यात्रा कंपनीची २० लाख रुपयांची फसवणुक करणा-या गुन्हेगारास गुंडा विरोधी पथकाने पुणे येथुन केली अटक केली आहे.
चौधरी यात्रा कंपनीचे संचालक फिर्यादी सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी दि. १६/१/२०२५ ते दि. २२/१/२०२५ दरम्यान मुंबई ते दुबई व अबुधाबी ते मुंबई अशा यात्रेचे आयोजन केले होते.
एकुण ५० यात्रेकरु या प्रवासाला जाणार असल्याने प्रवाशांनी चौधरी यात्रा कंपनीला पुर्ण रक्कम आगावु जमा केली होती. सदर यात्रेकरु यांचे मुंबई ते दुबई विमान तिकीटे काढण्यासाठी चौधरी यात्रा कंपनीने माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. संगमनेर जि. अहिल्यानगर यांना १०,८२,५०० रुपये रक्कम बँक खात्याद्वारे देवुन तिकीट काढण्याचे काम दिले होते.
त्याप्रमाणे आरोपी माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. यांनी ५० प्रवाशांचे एअर इंडिया व इंडिगो विमानाचे तिकीटे चौधरी यात्रा कंपनीस पाठविले. दि. १६/१/२०२५ रोजी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबई जाण्यासाठी ५० प्रवासी गेले असता फक्त ४ विमान तिकीटे विमानतळाचे सिस्टीमवर स्कॅनींग झाली व उर्वरीत ४६ तिकीटे दिसुन आली नाही.
त्यामुळे सदरची यात्रा रद्द करण्यात आल्याने माईल स्टोन हॉलीडेज प्रा. लि. कंपनीने विमानाचे बनावट तिकीटे काढल्यामुळे चौधरी यात्रा कंपनीची बदनामी झाल्याने आरोपी यांची माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. कंपनीने फिर्यादी यांचे यात्रा आयोजनासाठी झालेला खर्च व प्रवाशांना परत करावी लागलेली रक्कम अशी एकुण १९,८२,५०० रुपयांची फसवणुक केल्याने नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील आरोपीला तत्काळ अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथक आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने सदर गंभीर स्वरुपातील गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असतांना गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी तेजस वैष्णव हा पुणे येथे माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. कंपनीचे काम करत आहे.
ही माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव असे तत्काळ पुणे येथे रवाना झाले.
दिनांक २४/९/२०२५ रोजी गुंडा विरोधी पथकाने पुणे येथे परदेशामध्ये जाण्यासाठी तिकीट विकी करणाऱ्या यात्रा कंपनी यांना भेटून माईल स्टोन हॉलीडेज प्रा. लि. कंपनीचे संचालक आरोपी हे पुणे येथे कोणत्या परिसरात काम करतात बाबत माहिती घेतली. आरोपी तेजस वैष्णव हा बानेर व बावधान, पुणे या परिसरात फिरस्ता असुन त्याचे ऑफीस संगमनेर जि. अहिल्यानगर येथे असुन तो बानेर किंवा बावधान परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य गुन्हयातील पाहिजे आरोपी तेजस शशीकांत वैष्णव (वय ३१, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यास बानेर पोलीस ठाणे, पुणे शहर हद्दीतील विरभद्र नगर, बानेर, पुणे येथुन शिताफीने ताब्यात घेवुन पुढील कारवाई साठी नाशिक येथे आणुन सायबर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.