
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकहून दिल्लीला जाणार्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सातत्याने होणार्या मागणीचा विचार करून इंडिगो एअरलाईन्सकडून दुसरी नॉन-स्टॉप विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
26 ऑक्टोबर 2025 पासून ही सेवा सुरू होणार असून, यामुळे नाशिककरांसाठी आता दिल्लीला जाणे आणखी सोयीचे होणार आहे.
दिल्ली गाठण्यासाठी इंडीगोची सूरु असलेल्या सेवेसोबत आता त्यांनीच दुसरी सेवा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना सकाळ-संध्याकाळ दिल्लीसाठी थेट विमान मिळणार आहे. विशेषतः व्यावसायिक,विद्याथ व नाशिकनजीकच्या जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
दिल्लीसाठी नाशिकहून सतत विमानसेवेची मागणी होत होती. व्यवसायिक, पर्यटन व शासकीय दौर्यांच्या दृष्टीने नाशिक-दिल्ली या मार्गाला मोठे महत्त्व आहे. आता दररोज दोन थेट विमानांची सुविधा मिळाल्याने नाशिककरांची दिल्ली यात्रा अधिक सुलभ होणार आहे.या सोबतच विमानासोबतच कार्गो सेवा देखिल तितक्याच सक्षमपणे वापरली जात असल्याने विमान सेवेला मान्यता देण्यात आली आहे.
नविन विमेान सेवा ही
फ्लाइट क्रमांक 6ए 6635 : दिल्ली नाशिक (18:25 20:20),फ्लाइट क्रमांक 6ए 6636 : नाशिक दिल्ली (20:50 22:35)
ही सेवा एअरबस अ320 विमानावर संचलित होणार आहे.