दत्ता गायकवाड यांचा राजीनामा; नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे खिळल्या नजरा
दत्ता गायकवाड यांचा राजीनामा; नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे खिळल्या नजरा
img
Chandrakant Barve


नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- दिलेले वचन पाळत सहकार क्षेत्रात आदर्श घालून देत नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेच्या निवडणुकीपूर्वी जैन समाजाच्या प्रतिनिधीला अध्यक्षपदी बसवण्याचे आश्वासन दिले होते, आणि ते पूर्ण करत त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला.

२०२३ च्या जून महिन्यात बँकेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याने ‘सहकार’ पॅनलने एकहाती सत्ता संपादन केली. पॅनलचे नेते दत्ता गायकवाड आणि निवृत्ती अरिंगळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे सूत्र सांभाळण्यात आले. 

त्या वचनाचा मान राखत अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लवकरच जैन समाजाचा प्रतिनिधी अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. व्यापारी बँकेत जैन-माहेश्वरी समाजाचे तीन संचालक आहेत — डॉ. प्रशांत भुतडा (माहेश्वरी समाज), तर अशोक चोरडिया आणि सुनील चोपडा (जैन समाज). सध्या डॉ. भुतडा हे उपाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. पुढील अध्यक्षपदी संचालक अशोक चोरडिया किंवा सुनील चोपडा यांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे, त्यात चोरडिया यांचे पारडे अधिक जड असल्याचे समजते.

या वेळी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, जनसंपर्क संचालक अरुण जाधव, संचालक रामदास सदाफुले, सुनील आडके, मनोहर कोरडे, श्रीराम गायकवाड, रमेश धोंगडे, अशोक चोरडिया, वसंत अरिंगळे, विलास पेखळे, नितीन खोले, गणेश खर्जुल, सुधाकर जाधव, योगेश नागरे, संचालिका रंजना बोराडे, कमल आढाव, कर्मचारी प्रतिनिधी मंगेश फडोळ, संजय पागिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार, एकनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

दत्ता गायकवाड यांनी दिलेले वचन पूर्ण करून स्वेच्छेने पदाचा त्याग केल्याने सहकार क्षेत्रात त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. बँकेच्या संचालक मंडळात आता नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group