नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली;
नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली; "हे" आहेत नाशिकचे नवे जिल्हाधिकारी
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक - नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची शासनाने बदली केली असून त्यांच्या जागेवर जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिकच्या कुंभमेळा आयुक्तपदी शेखर सिंह यांची नियुक्ती केली आहे. 


राज्य सरकारने मंगळवारी राज्यातील सात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने बदली होणार म्हणून चर्चेत असलेले नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागेवर जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून पदभार असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्याकडून कुंभमेळ्याच्या आयुक्त पदाचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांच्या जागेवर कुंभमेळा आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

याच बरोबरने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांची मुंबई प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सदस्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जळगावच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे संजय कोलते यांची रिक्त पद असलेल्या साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबई रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापक मनोज जिंदाल यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group