
नाशिक -नाशिकचे सुपुत्र आणि हवाई दलातील फायटर पायलट ग्रूप कॅप्टन कुणाल विश्वास शिंपी यांनी 'ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखवलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल त्यांना हवाईदलदिनी वायू सेना (शौर्य)’ पदकाने सन्मानित करण्यात आल्याने संपूर्ण नाशिककरांची छाती गर्वाने फुलली आहे.
८ ऑक्टोबरला गाजियाबाद हिंडन येथे हा दिमाखदार सोहळ्यात शिंपी यांचा हवाईदल प्रमुखांच्या हस्ते हा सन्मान झाला.स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती कार्यालयातर्फे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान वैशिष्ट्यपूर्ण अचूक, भेदक कामगिरी करून त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेला उजाळा दिला.संयम, नम्रता आणि उच्च शिस्तीचे प्रतिक असलेले कुणाल शिंपी हे अनेकांचे प्रेरणास्थान ठरले आहेत.
नाशिक मनपाचे निवृत्त अधिकारी मुरलीधर शिंपी यांचे नातू तर रोटेरियन विश्वास शिंपी यांचे ते पुत्र आहेत.