
लासलगाव - चोरोके के साथ दोस्ती की है, कुत्तो के साथ होली मनायेंगे ,धारा ३०२ भी लग सकता है ३०७ समजके असे हातात कोयता घेऊन रील वायरल करणाऱ्या टोळक्यांना नाशिक पोलीस अधीक्षक यांचे पथक आणि लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन चांगला धडा शिकवला आहे. नाशिक ग्रामीण मध्ये लासलगाव पोलीस ठाण्याने पहिलीच मोठी कारवाई केल्याने सर्वत्र त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
लासलगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित टवाळखोर हे दिंडोरी तालुक्यातील असून विंचूर येथे त्यांनी हा रील बनवत दहशत माजवण्याचा प्रकार केला. या प्रकरणी समाधान टोंगोरे, सोंनगाव ता दिंडोरी, खंडू टोंगोरे, विजय बोंबले, रा. फोफाळवाडे, दीपक वाघमारे, रा. उमराळे, समीर जाधव रा. सोनगाव यांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नियुक्त केलेल्या पथकातील सुशांत मरकड, जालिंदर खराटे, सचिन पिंगळ, मंगेश गोसावी, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या संयुक्त कारवाईने या टवाळखोरांना ताब्यात घेत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याची चूनुक दाखवून त्यांना तातडीने ताब्यात घेतले. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नाशिक शहराबरोबर ग्रामीण भागातही नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही संकल्पना राबविल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत लासलगाव पोलीस पुढील तपास करत आहे.