पोलीस आयुक्त व मनपा अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून मागितली खंडणी
पोलीस आयुक्त व मनपा अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून मागितली खंडणी
img
दैनिक भ्रमर


पोलीस आयुक्त व महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे भासवून एका फटाका विक्रेत्या कडून दोन जणांनी 12 लाख रुपये उकळल्याची घटना वडाळा रोड परिसरात घडली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी सारंग प्रताप चांदे हे फटाका व्यवसाय करतात मे 2025 ते 8 ऑक्टोबर 2025 या दरम्यान वडाळा रोड वरील हॉटेल बरकत येथे आरोपी तहसील शेख आणि सचिन मोगल यांनी फिर्यादी यांना आपली पोलिस आयुक्त आणि मनपाच्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे भासविले.

तसेच आरोपीने त्याच्याकडे महाराष्ट्र शासनाचा सही शिक्का व शासकीय मोहोर असलेला परवाना दाखवून फिर्यादी चांदे यांचा विश्वास संपादित केला चांदे यांना फटाके विक्रीच्या व्यवसायाकरिता आवश्यक असलेले अग्निशमन दलाचे सही शिक्के व शासकीय मोहर असलेला ना हरकत दाखला व पोलीस आयुक्त कार्यालयाकडील पोलीस आयुक्त यांच्या सहीचा परवाना मिळवून देण्याकरिता दोघा आरोपींनी चांदे यांच्याकडून 12 लाख रुपये घेतले.

त्याने या पैशांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला नंतर आरोपींनी चांदी यांना जीवे मारण्याची धमकी व दमदाटी करून एक लाख रुपये खंडणी घेतली आरोपींनी पोलीस आयुक्त यांच्या नावाची भीती दाखवून त्यांच्या नावाने पुन्हा दीड लाख रुपयांची खंडणी मागितली.

ती फिर्यादी चांदे यांनी पूर्ण न केल्याने परवानगीची व पूर्ण फाईल रद्द करण्याची तसेच फटाका विक्रीचा तर काय पण तुझा दारू विक्रीचा देखील व्यवसाय बंद करतो तुझे जगणे मुश्किल करतो अशी धमकी त्यांनी दिली.

याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर करीत आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group